ऍनिमिया आणि आपण

CBC म्हणजे 'Complete Blood Count'. ही अत्यंत सोपी टेस्ट आहे. यात रक्तातील पेशींच्या संख्येबाबत पूर्ण माहिती मिळते." ही टेस्ट केल्याने ॲनिमिया, इतर संसर्ग, काही प्रकारचे कॅन्सर ओळखता येऊ शकतात. म्हणून सीबीसी टेस्ट महत्वाची असते. ती वेळेत करणे महत्वाचे!

सीबीसी चाचणी करून हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, ते लक्षात घेतलं जातं. पुरुषांमध्ये सरासरी 13 ते 16 ग्रॅम टक्के तर स्त्रियांमध्ये 11 ते 14 ग्रॅम टक्के व लहान मुलांमध्ये १३ ते १७ ग्रॅम तर वृद्ध(स्त्री आणि पुरुष दोन्ही) लोकांमध्ये ११ ते १२ ग्राम टक्के एवढे प्रमाण नॉर्मल आहे. तसेच PCV म्हणजेच Packed Cell Volume चं प्रमाण ३५ टक्क्यांपेक्षा कमी झालेलं आढळते. सीबीसीच्या (CBC) च्या रिपोर्ट मधील MCV, MCH & MCHC यांच्या आकड्यावरून ॲनिमियाची कारणे शोधून काढण्यासाठी मदत होते. हल्लीच्या काळात आधुनिक पद्धतीच्या Cell Counter मशिनमध्ये आर आय डब्ल्यू (RDW ) म्हणजे तांबड्या पेशींचा सरासरी परिघ या चाचणीतून लोहाच्या कमतरतेमुळे झालेला ॲनीमिया बहुतांशी अचूक पद्धतीने निदान करता येतो . आरडीडब्ल्यू ( RD W ) चा आकडा 16% पेक्षा वाढलेला असल्यास ८० टक्के शक्यता आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाचीच असते. तसेच तज्ञांनी बघितलेल्या पेशींच्या घनतेवर, आकारमाना वरून ॲनिमिया नक्की कोणत्या कारणांनी झाला असेल, हे अचूक हेरणे आज शक्य झाले आहे. योग्य वेळी आपल्या हिमोग्लोबिन तसेच सीबीसीची (CBC ) चाचणी आणि पॅथॉलॉजिस्टने सूक्ष्मदर्शकाने केलेल्या पेशींच्या चाचणीद्वारे (Peripheral Smear Morphology) लवकरात लवकर निदान होऊन रुग्ण बरा होऊ शकतो. HB - हिमोग्लोबीन. PCV- तांबड्या पेशींचे रक्तातील प्रमाण. RD W तांबड्या पेशींचा सरासरी परीघ Morphology- पेशींचा आकार आणि विकृत पेशींचा अभ्यास.

तांबड्या, श्वेत पेशी, तसेच प्लेटलेट्स जास्ती आणि कमी होण्याची कारणे अनेक प्रकारची असू शकतात. आपल्या रक्तातील आर बी सी (RBC ) म्हणजे तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. शरीरातील विविध पेशींना प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम आरबीसी करीत असतात. आपल्या फुफ्फुसापासून शुद्ध प्राणवायू हिमोग्लोबिनमध्ये विरघळून रक्ताभिसरणाद्वारे निरनिराळ्या अवयवात पोहोचतो. हिमोग्लोबिन हा घटक सरासरीपेक्षा कमी झाल्यास वर नमूद केलेली प्रक्रीया योग्य रीतीने होत नाही. अनीमिया चा प्रकार कोणता असेल ह्याच्या अचूक निदानासाठी आणखी काही तपासण्या :

आयर्न स्टडीजसिरम फेरिटीन टेस्ट - यामध्ये पूर्ण शरिरातील रक्त आणि इतर अवयवांमध्ये किती प्रमाणात लोह आहे हे तपासले जाते.

ट्रान्सफेरिन टेस्ट - रक्तातील लोहाचे वहन किती चांगल्या प्रकारे होते हे दर्शवणारी चाचणी.

टि.आय.बि.सी. - रक्तातील प्रथिने आणि लोह यांचा परस्पर बंध व त्याचे वहन या चाचणीत कळते.

ट्रान्सफेरिन सॅच्युरेशन - ट्रान्सफेरिन हे प्रथिन लोहाचे - रक्तामार्फत सर्व अवयवांपर्यंत वहन करते. वरील तपासणीतून किती प्रमाणात हे प्रथिन लोहाशी जोडले आहे हे तपासले जाते. विट. बी-12/फॉलिक ॲसिड रक्तातील विटामिन बी-12 व फॉलिक ॲसिड यांचे अचुक प्रमाण कळते व त्यापद्धतीने उपचार करता येतात.

बोनमॅरो तपासणी - हाडांमधे नवीन रक्तपेशी जिथे बनतात - त्याला बोनमॅरो असे म्हणतात. रक्तक्षयाचे योग्य कारण रक्ततपासणीतून स्पष्ट होत नसेल किंवा कॅन्सरची शक्यता वाटत असेल तर ही तपासणी केली जाते. यात मुळ रक्तपेशींचा आकार, संख्या, त्यांचे बाह्य रुप यावरुन आजाराचे अचुक निदान करणे शक्य होते.

एच. बी. ईलेक्ट्रोफोरेसिस - थैलासिमिया आणि सिकलसेल ॲनिमिया यांचे निदान करण्यासाठी ही चाचणी केली जाते.

मल चाचणी - म्हणजेच स्टूल रूटीन विथ ऑक्ल्ट ब्लड - अत्यल्प प्रमाणात आतड्यातील रक्तस्रावाचे निदान व हुकवर्मची अंडी आढळल्यास ही चाचणी केली जाते.

वरील तपासण्या योग्य वेळेत केल्यास आजार जास्त बळावणार नाही व त्याचे निराकरण सहज सोप्या पद्धतीने केले जाऊ शकते.

राजेश इंगोले,
डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल,
वैद्यकीय अधिक्षक, अमरावती.