भारत हा रक्तक्षयाचे मोठे प्रमाण असलेल्या जगातील देशांपैकी एक आहे.जवळपास ५५%लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे. त्यांत ५ वर्षापेक्षा लहान मुले व गर्भवती महिला अधिक आहेत.
हिमोग्लोबिन कमी झाल्याने अंदाजे २० टक्के मातांचा मृत्यू होतो आणि अप्रत्यक्षरित्या आणखी २० टक्के माता मृत्युमुखी पडतात. रक्तक्षयामुळे केवळ गर्भधारणेवरच परिणाम होत नाही तर गर्भधारणेच्या क्षमतेवरही होतो. कुमारवयीन मुलींमध्ये रक्तक्षयामुळे अपरिपक्व प्रसूती, अर्भकाचे कमी वजन अथवा ह्यापेक्षा वाईट म्हणजे प्रजननक्षमता कमी होते. ज्या स्त्रियांना पुरेसे लोह मिळत नाही, त्यांचा बीजोत्सर्ग व्यवस्थित होत नाही, यामुळे निकृष्ट बिजांडाची निर्मिती होते. रक्तक्षयी स्त्रियांना गर्भधारणा झाल्यास त्यांची अर्भके वेळेआधी जन्म घेण्याचा धोका असतो. अशी वेळेआधी जन्माला आलेल्या अर्भकांची रोगप्रतिकार क्षमता अल्प असते आणि ते एक वर्षदेखील जगण्याची शक्यता नसते. मातेला रक्तक्षय असल्यास अर्भकाचा मृत्यूदेखील होवू शकतो.
रक्तक्षय हा वरवर साधा, कुठलीही तीव्र लक्षणे न दाखवणारा रोग असला तरी त्यामुळे जीविताला धोका उद्भवू शकतो. म्हणूनच मातांचे, कुमारवयीन मुलांचे आणि बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी अनेक रक्तक्षय प्रतिबंधक आणि नियंत्रण कार्यक्रम राबवले जात आहेत. तथापि, पोषणविषयक रक्तक्षय जो निकृष्ट आहार आणि सदोष जीवन शैलीमुळे होतो, तो वेळोवेळी तपासण्या आणि उपाययोजना करून रोखता येऊ शकतो. प्रक्रिया केलेल्या अन्नापेक्षा सकसता वाढवलेले अन्न घेणे, नियमित लोह पुरवठा हे रक्तक्षय प्रतिबंधित अथवा बरा करू शकते.
शरीरातील अनेक कृतिशील द्रव पदार्थांपैकी रक्ताचा क्रमांक अर्थातच पहिला. रक्त अनेक घटकांपासून बनते . रक्तातील लोहाच्या खालावलेल्या पातळीला वैद्यकीय भाषेत "रक्तक्षय" म्हणतात. रक्तक्षय असा रोग आहे, ज्यात लाल रक्तपेशींची संख्या अथवा त्यांची ऑक्सिजन वहनक्षमता ही शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे नसते. रक्तक्षयाचे प्रमाण, रुग्णाचे वय, लिंग, उंची, धूम्रपान आणि महिलांना गर्भधारणा असल्यास, त्या गोष्टींवर अवलंबून असते. रक्तक्षय हे केवळ भारतातीलच नाही तर इतर विकसनशील देशातही आरोग्यावरील एक मोठे संकट आहे.
कारणे –
रक्तक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे आहारात लोह, ब १२ जीवनसत्त्व, फॉलिक ऍसिड , अ जीवनसत्त्व, क जीवनसत्त्व आणि निऍसिनसारख्या बी कॉम्प्लेक्स समुहातील इतर अनेक घटकांची कमतरता होय ! प्रोटीन्स, हिमोग्लोबिन कमतरता रक्तक्षयाला आमंत्रण देणारे ठरते.
(प्रथिने) क म्हणजे प्रोटीन्स होय. केवळ आहारातील घटकांतील कमतरतांमुळेच नव्हे, तर ( काही शब्द सुटले का मॅम ? )
मलेरिया, जंतुसंसर्ग, अति रक्तस्राव, मूत्रपिंडांचे आजार आणि हायपोथायरॉडिझम, पाईल्स,अल्सर इ.मुळे आतड्यामध्ये रक्तस्त्राव यांच्यामुळेही हिमोग्लोबिनचे प्रमाण खाली येऊन रक्तक्षयाचा विकार बळावू शकतो. रक्तक्षय हा सुप्तावस्थेतील आजार असल्याने तो कळून येत नाही. जेव्हा हिमोग्लोबिन १० पेक्षा कमी होते तेव्हा कार्यक्षमता कमी होणे, वर्तनातील विकृती, ढासळलेली रोगप्रतिकार क्षमता, मुलांमध्ये खालावलेली शिक्षण क्षमता आणि सर्वात वाईट म्हणजे प्रसूती नंतरही अर्भकाच्या आरोग्य समस्या इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात.
लक्षणं
१.अशक्तपणा
२.लक्ष केंद्रित न होणे
३. दम लागणे
४.चिडचिड ५.छातीत धडधडणे
६. त्वचा पांढरी पडणे
७.लहान मुलांमध्ये भूक मंदावणे,वजन न वाढणे
८. वारंवार आजारी पडणे
निदान कसे केले जाते?
संपूर्ण शारिरीक तपासणी,
रक्त तपासणी,
बोन मॅरो तपासणी.
उपचार पद्धती
लोहाची मात्रा,
ब जीवनसत्वाची मात्रा,
जन्मजात दोष असल्यास रक्त देणे, तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांट.
आहार कसा असावा ?
आहारात ऋतूपरत्वे भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, रंगीबेरंगी फळे इ.चा समावेश असावा.त्यांतील तंतुमय पदार्थांमुळे बद्धकोष्ठतेवर नियंत्रण ठेवता येते. तसेच मोड आलेले कडधान्ये, तृणधान्येगुळ, खोबरे, तीळ,शेंगदाणे, कारळं, सुका मेवा, खजूर, मनुका
दुध व दुग्धजन्यपदार्थ, सोयाबीनच्या वड्या,स्वयंपाक करताना लोखंडी भांडी वापरणे, भाज्या चिरण्यापूर्वीच स्वच्छ धुवून घ्याव्यात. नेहमी ताजे अन्न खावे.जंक फुड, प्रक्रिया केलेले पदार्थ,चहा काॅफी तत्सम पदार्थाचे सेवण टाळावे
हिमोग्लोबिन कमी असण्याकडे दुर्लक्ष करू नका, हाच आमचा कळकळीचा इशारा आहे.
डॉ. सुषमा हिर्लेकर,
सेवाव्रती,
डॉ. हेडगेवार हॉस्पीटल,
अमरावती.