व्यसन मुक्ती

व्यसन करणे वाईट आहे. वारंवार दारू पिण्याची इच्छा हा मानसिक आजार आहे. दारूमुळे अनेकांची घरे उध्वस्त होतात. घरातील मुलांवर व्यवस्थित संस्कार होत नाहीत. स्रियांवर अत्याचार  होतात. त्यामुळे त्यांचे जीवन असुरक्षित रहाते. व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक ईत्यादी प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात, हे सर्वश्रुत आहे. तरीही लोक व्यसनाधीन होतात. त्याची अनेक कारणे आहेत.

लोक व्यसन का करतात?
 
-    सुरुवातीला कुतूहल म्हणून ....

-    व्यसनाचे नेमके काय परिणाम होतात ते जाणून घेण्यासाठी ...

-    चागले वाटते म्हणून.

-    थोड्या वेळेपुरता मिळणारा आनंद अनुभवण्यासाठी, कंटाळवाणेपण कमी करण्यासाठी ...

-    कधी कधी मित्रांच्या आग्रहास्तव ...

-    कधी कधी तणाव मुक्तीसाठी, झोप येण्यासाठी, एकटेपणा दूर करण्यासाठी , नकारात्मकता दूर करण्यासाठी ...

-    व्यसनाची सवय झाल्याने व नंतर ते न केल्यामुळे होणारा त्रास असह्य झाल्याने ....(उदा.हात कापणे, लक्ष न लागणे ,मन अस्वस्थ होणे,झोप न लागणे  टाळावे म्हणून . ही स्थिती आल्यास बर्याच रुग्णांचा असा गैरसमज होतो की आता माझ्यासाठी व्यसन सोडणे अशक्य आहे.)

-    मानसिक आजाराच्या लक्षणांपासून काही काळ आराम मिळण्यासाठी.

व्यसनांचे काही प्रकार

-    दारू

-    तंबाखू, सिगारेट , गुटखा

-    गांजा, चरस .

-    अंगदुखीचे, खोकल्याचे औषध म्हणून

-    कोकेन , मेफेड्रीन,अम्फिटामाइन .

-    आयोडेक्स , व्हाइटनर ,सोलुशन, बाम , नेलपेंट.

 

व्यसनाचा शरीरावर होणारा परिणाम

 मेडिकलमध्ये शिक्षण घेत असताना आमचे शिक्षक व्यसनाबद्दल सांगायचे, “डोक्याच्या केसापासून तर तळपायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत शरीराच्या सर्वच भागांवर व्यसनाचा वाईट परिणाम होतो.सध्या भाषेत सांगायचं तर  व्यसन हे स्लो  पाँयझन म्हणजे विष आहे, “असं म्हणायला हरकत नाही.
 
दारूच्या व्यसनामुळे लिव्हर खराब होणे, हे सर्वश्रुत आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होतो, हे तंबाखूच्या पाकिटावर लिहिणे बंधनकारक आहे.

 याशिवाय  हृदयरोग, किडनी विकार , पोटाचे विकार, फुफुसाचे विकार, चर्मरोग हे  देखील व्यसनामुळे उद्भवतात. 

हे सर्व वारंवार डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक सांगत असतात. मात्र तरीही व्यसनांचा वापर कमी न होता वाढताना दिसतो आहे. तरुणांमध्ये तर व्यसन अधिक प्रमाणात वाढते आहे.

आपण कोठे कमी  पडतो?

-    लहान व तरुण मुलांमध्ये जाहिरातीने, सोसायटी मधील रोल माँडेल्सने व्यसनांना प्रोत्साहन मिळेल, अशा जाहिराती करणे.

-    व्यसनाकरिता सामाजिक मान्यता , मानसिकता तयार केल्याने .

-    घरातील , समजतील वातावरणावरील आपला ताबा गेल्यामुळे सामाजिक विशमतेमुळे. (आर्थिक, सामाजिक)·

-    तंत्रज्ञानाचा उपयोग करताना यु ट्यूब, नेटफ्लिक्स, सोशल  मिडिया, याद्वारे जगातल्या वेगवेगळ्या कल्चर (परंपरा) सामोरे गेल्यामुळे तिथल्या, खाण्यापिण्याच्या पद्धतीचे अनुकरण केल्यामुळे.

-    शालेय शिक्षणाच्या वेळेस व्यसनाचे दुष्परिणाम सांगण्यास कमी पडत असल्यामुळे .

-    मुल्यांवर आधारित समाजाची निर्मिती कमी करण्यास सर्वांनाच अपयश येत असल्यामुळे.

उपाय

-    व्यसन हा आजार आहे, हे कबुल करणे .

त्यामुळे व्यसनी व्यक्ती हा योग्य मार्गदर्शनाखाली व्यसन सोडू शकतो , ही अशा निर्माण होईल. समाजाचा व्यसनी व्यक्तीबद्द्ल तिरस्कार कमी होईल, त्याची व्यसन सोडण्याची अंगभूत प्रेरणा वाढण्यास मदत होईल.

-    व्यसन सोडणे हे शक्य आहे, हे जाणून घेणे.

-    याबद्द्ल जनजागृती करणे ( वृत्तपत्र, सोशल मिडिया  – सामाजिक माध्यम, टी व्ही इत्यादी.

-    व्यसन सोडण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांना सामाजिक समर्थन प्रणाली तयार करणे.

-    लहान मुलांच्या शिक्षण प्रणालीमध्ये त्याबद्दल त्यांना जागृत करणे.

-    व्यसन सोडणाऱ्या लोकांनी एक ग्रुप तयार करून समाजातील बाकी व्यसनी लोकांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी काम करणे.

-    व्यसनाच्या जाहिरातींना सर्व प्रकारे आळा घालणे.

-    लहान मुलांच्या शिक्षणामध्ये चांगल्या जीवनशैलीचे शिक्षण सामाविष्ट  करणे.

-    मुल्यांवर आधारित समाजाची निर्मिती करण्यास सर्वांनी हातभार लावणे.
    

व्यसनी व्यक्ती स्वतःच्या भावनांवर, विचारांवर नियंत्रण गमावून बसते. व्यक्तीला मुळात काही स्वभाव दोष, मानसिक विकार असतील तर ते उफाळून येतात. बोलण्यातली सुसंगती बिघडते. वागण्यातला तोल बिघडतो. असे लोकं स्वत: सोबतच कुटुंबियांचं सामाजिक जीवन त्रासदायक बनवतात. काहीना भीती वाटते की व्यसन केला नाही तर अस्वस्थपणा येईल, झोप लागणार नाही, चिडचिड, त्रास होईल.पण तीव्र इच्छाशक्ती हवी आणि सोबत समुपदेशकाचा सल्ला. यातून बाहेर काढण्यास गरज आहे सुयोग्य समुपदेशकाची !

 

डॉ.अक्षय चांदुरकर

मानसोपचारतज्ज्ञ  , डॉ हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती