लठ्ठपणा

व्याख्या:

Obesity हा शब्द लॅटिन शब्द "OBESUS" म्हणजे चरबी यावरून घेतला आहे. लठ्ठपणा ही एक वैद्यकीय स्थिती आहे जिथे शरीरातील अतिरिक्त चरबी इतक्या प्रमाणात जमा होते की त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे आयुर्मान कमी होते व तसेच इतर आरोग्य समस्याही वाढतात.

बॉडी मास इंडेक्स (BMI) 25 पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींना जास्त वजन मानले जाते, तर ज्यांचे BMI 30 पेक्षा जास्त आहे त्यांना लठ्ठ म्हणून वर्गीकृत केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ५ ते १९ वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये जास्त वजन आणि लठ्ठपणाचे प्रमाण गेल्या काही वर्षातच ४% वरून ते १८ % पर्यंत वाढले आहे.

शरीराला काम करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते ती कॅलरीजपासून मिळते. शरीराच्या गरजेपेक्षा अधिक कॅलरीज घेण्यात आल्यास त्या साठून राहतात व लठ्ठपणास सुरुवात होते. सुरुवातीला चरबीच्या पेशी (Fat cells/adipose tissue) आकाराने वाढतात पण  आकाराची मर्यादा संपते. त्यानंतर दुस-या पेशी तयार होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे चरबीच्या पेशी वाढत जातात व स्थूलपणा येतो. यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की, वजन कमी होते तेव्हा चरबीच्या पेशींचा आकार कमी होतो. पण संख्या मात्र कमी होत नाही. स्थूलपणा हा एक गंभीर आजार असून याकडे दुर्लक्ष करत कामा नये. कारण वाढलेले वजन अनेक आजारांचे मूळ आहे.

लठ्ठपणाने होवू शकणारे गंभीर आजार
१) मेंदू आणि मज्जासंस्था: स्ट्रोक, इडिओपॅथिक इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शन, मेरॅल्जिया पॅरेस्थेटिका.
२) पोटाचे आजार: पित्ताशय रोग (पित्ताशयाचा दाह ), नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (NASH), फॅटी लिव्हर, रिफ्लक्स एसोफॅगिटिस.
३) श्वसन मार्ग: ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया, ओबएसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम (पिकविकियन सिंड्रोम), वारंवार श्वसन संसर्ग, ब्रोन्कियल अस्थमाचे प्रमाण वाढणे.
४) कर्करोग: एंडोमेट्रियल, प्रोस्टेट, पित्त मूत्राशय, स्तन आणि कोलन कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग.
५) मानसशास्त्रीय: सार्वजनिक दुषण, नैराश्य येणे.
६) हाडे व सांधे: ऑस्टियोआर्थ्रोसिस, कोक्सा वारा, स्लिप्ड कॅपिटल फेमोरल एपिफाइसेस, ब्लाउंट रोग आणि लेग-कॅल्व्ह-पर्थेस रोग, क्रॉनिक  लम्बॅगो.
७) चयापचय: इन्सुलिन प्रतिरोध, हायपरइन्सुलिनमिया, टाइप 2 मधुमेह, डिस्लिपिडेमिया (एकूण उच्च कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराइड्स, सामान्य किंवा वाढलेला LDL / कमी HDL ).
८) प्रजनोत्पादन क्षमता: एनोव्हुलेशन, लवकर यौवन, वंध्यत्व, हायपरंड्रोजेनिझम आणि स्त्रियांमध्ये पॉलीसिस्टिक अंडाशय, पुरुषांमध्ये हायपोगोनाडोट्रॉफिक हायपोगोनाडिझम.
९) प्रसूती पूर्व आणि पश्चात: गर्भधारणेशी संबंधित उच्च रक्तदाब, गर्भाची मॅक्रोसोमिया आणि पेल्विक डायस्टोसिया.
१०) इतर धोकेः जखमेचा संसर्ग डीप व्हेनस थ्रोम्बोसिस, पल्मोनरी एम्बोलिझम आणि पोस्ट ऑपरेटिव्ह न्यूमोनिया यासह शस्त्रक्रियेतील वाढीव जोखीम आणि पोस्ट ऑपरेटिव्ह गुंतागुंत.
१1) त्वचारोग: इंटरट्रिगो (दोन्ही जिवाणू किंवा बुरशीजन्य), ऍकॅन्थोसिस निग्रिकन्स, हर्सुइटिसम, सेल्युलाईट्स, कार्बंकल्सचा धोका वाढतो.
१2) हातपाय: व्हेरिकोज व्हेन्स
१3) विविध: मंदपणा, वैयक्तिक स्वच्छता राखण्यात अडचण.
१4) रक्तवाहिन्यासंबंधी: उच्च रक्तदाब, कोरोनरी धमनी रोग, लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी, कोर पल्मोनेल, लठ्ठपणा संबंधित कार्डिओमायोपॅथी,  फुफ्फुसाचा उच्च रक्तदाब.

लठ्ठपणाचे निदान:
मेडिकल हिस्टरी: रुग्णाचे वजन, आहार, शारीरिक हालचाली आणि व्यायामाच्या सवयी, दिर्घ काळासाठी सुरू असलेली औषधे,मानसिक ताण तणाव ई. याबरोबरच फॅमिली हिस्टरी म्हणजेच मागच्या पिढीतील कुणाला असा विकार आहे का ? याबद्दल माहिती घेण्यात येते.
आरोग्य तपासणी: यामध्ये वजन, उंची, हृदय गती, रक्तदाब आणि तापमान ई.
बीएमआय : बॉडी मास इंडेक्स म्हणजेच  बीएमआय. ३० किंवा त्यापेक्षा जास्त बीएमआयला लठ्ठपणा मानला जातो. तुमचा बीएमआय वर्षातून एकदा तरी तपासा. 
कंबरेचा आकार / घेर: कंबरेभोवती साठलेली चरबी, ज्याला काहीवेळा व्हिसेरल फॅट किंवा ओटीपोटाची चरबी म्हणतात, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढवू शकते. 35 इंच (89 सेंटीमीटर) पेक्षा जास्त कंबर असलेल्या स्त्रिया आणि 40 इंच (102 सेंटीमीटर) पेक्षा जास्त कंबर असलेल्या पुरुषांना लहान कंबर माप असलेल्या लोकांपेक्षा जास्त आरोग्य धोके असू शकतात. बीएमआय मापन प्रमाणे, कंबरेचा घेर वर्षातून एकदा तरी तपासला पाहिजे.

इतर आरोग्य समस्या:  आरोग्यविषयक इतर समस्या जसे की उच्च रक्तदाब व कोलेस्टेरॉल, थायरॉईड, यकृत समस्या आणि मधुमेह यांसारख्या समस्यांची देखील तपासणी केली जाते.

लठ्ठपणाचे प्रकार
१) बैठी जीवनशैली किंवा शारीरिक निष्क्रियतेमुळे येणारा लठ्ठपणा: शारीरिक हालचाली कमी असल्यास  वजनात वाढ होते. शारीरिक निष्क्रियता म्हणजे बसून काम करणारे लोक सक्रिय लोकांपेक्षा कमी कॅलरी बर्न करतात. नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशन एक्झामिनेशन सर्व्हे (NHANES) ने दर्शविले की, शारीरिक निष्क्रियता स्त्री व पुरूष दोन्हींमध्ये वजन वाढण्याशी संबंधित आहे.यामुळे पोट सुटणे, ओटीपोटाचा आकार वाढतो.
२) आहारातून येणारी लठ्ठपणाः वैयक्तिक आवडी निवडी, अतिरिक्त खाणे, तसेच  गोड आणि तेलकट पदार्थ, जंक फूड जास्त खाण्याने शरीराच्या मधल्या भागात म्हणजेच पोटाच्या आजुबाजुला अतिरिक्त चरबी जमा होते आणि  वजन वाढते.
३) चिंता व मानसिक तणावामुळे येणारा लठ्ठपणाः चिंता किंवा नैराश्यामुळे अनेकदा जास्त खाणे आणि जंक फूडचे अतिसेवन या मुळे शरीरात चरबी जमा होऊ शकते. या प्रकारच्या लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी चिंता, तणाव यांच्या मुळाशी जाऊन मानसोपचार घेणे आवश्यक आहे. सामान्य उपचारांमध्ये औषधोपचार, कॅफिनचे सेवन कमी करणे यांचा समावेश होतो.
४) व्हेनस ओबेसिटी: लठ्ठपणाचे एक कारण आहे जे अनुवांशिक स्वरूपाचे आहे. या प्रकारचा लठ्ठपणा गरोदरपणात बहुतेक होतोच.  या समस्येवर व्यायाम हा सर्वोत्तम उपाय आहे.
५) अन्नातील ग्लुटेनचे अतिप्रमणामुळे येणारा लठ्ठपणाः गहू, तांदूळ शिजवल्यावर त्यातील चिकटपणा म्हणजे ग्लूटेनमुळे लठ्ठपणा होऊ शकतो. वजन वाढण्याचा हा प्रकार स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य आहे. यौवन, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती सारख्या हार्मोनल बदलांच्या कालावधीत हे  सहसा दिसून येते.
६) एथेरोजेनिक लठ्ठपणाः ज्या लोकांच्या पोटात चरबी जमा होण्याची प्रवृत्ती असते ते बहुतेक एथेरोजेनिक लठ्ठपणाने ग्रस्त असतात. ही एक विशेषतः धोकादायक स्थिती आहे कारण ती तुमच्या इतर अवयवांवर परिणाम करू शकते आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. एथेरोजेनिक लठ्ठपणा असेल तर अल्कोहोल पिणे टाळणे अत्यंत महत्वाचे आहे.

लठ्ठपणासाठी जबाबदार घटक 
l दैनंदीन जीवनशैली
l शारिरीक आजार
l मानसिक आजार
l अनुवांशिकता
l अयोग्य आहार पद्धती 
l शारीरिक व्यायामाचा अभाव
l दीर्घ काळासाठी सुरू असणाऱ्या औषधांमुळे येणारा लठ्ठपणा
l फास्ट फूडचे अधिक सेवन
l शारीरिक हालचालींसाठी प्रतिकूल वातावरण
l जंक किंवा फास्ट फूडची जाहिरात

उपचार:
प्राथमिक उपाय
१) शारीरिक हालचाल व व्यायाम आणि व्यायामप्रौढांना आणि मुलांना नियमित शारीरिक हालचालींमध्ये गुंतण्यासाठी आणि बैठी क्रिया कमी करण्यास प्रोत्साहित करा.
अ) मुले आणि किशोरवयीन मुले: दररोज किमान एक तास सक्रिय खेळ आणि इतर क्रिया, ज्यात मध्यम - तीव्रता असलेले व्यायाम जसे एरोबिक शारीरिक व्यायाम, स्नायू-मजबूत व्यायाम आणि हाडे मजबूत करण्याच्या व्यायामचा समावेश आहे.
ब) प्रौढ: साप्ताहिक किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम. आठवड्यातून किमान ७५ मिनिटे थकवणारे व्यायाम, तीव्रतेचा व्यायाम. 
अतिरिक्त आरोग्य फायद्यांसाठी हे देखील विचारात घ्या:
- बलवृद्धी / प्रतिकारवृद्धी व्यायामः २-३ दिवस / आठवडा
- न्यूरोमोटर व्यायाम: (संतुलन, चपळता आणि समन्वय) २, ३ दिवस / आठवडा
- लवचिकता व्यायामः  - २ दिवस/आठवडा.

२) आहार आणि खाणे: विविध पौष्टिक पदार्थांच्या सेवनास लहान वयापासूनच प्रोत्साहन द्या.
-    जास्त उष्मांक असलेले पदार्थ आणि साखर, शितपेये, तळलेले पदार्थ, पॅकेजेड फूड ,जंक फूड टाळा.
-    बाल्यावस्थेत स्तनपानाला प्रोत्साहन आणि समर्थन द्या.
-    फळे, पालेभाज्या, फायबर युक्त आहार घ्या.
-    घरगुती जेवण करा आणि बाहेर खाणे टाळा, तसेच  फास्ट फूड खाणे टाळा.
-    मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित करा. घरचे अन्न आणि पेये घेण्यासाठी प्रोत्साहित करा.

३) झोप: वयानुसार झोपण्याच्या कालावधीची सवय करा.
-    लहान मुले वय ३- ५  वर्षे    : ११ -१३  तास
-    शालेय वय  ५ ते १ २ वर्षे    : १०-११ तास
-    किशोर वय १२-१८ वर्षे    : ९-१० तास)
-    प्रौढ 18 वर्षे व पुढे    : ७-८ तास

द्वितिय उपाय

१)    बीएमआयचे वार्षिक मूल्यांकन व योग्य तज्ञांचा सल्ला
२)    वजन व्यवस्थापनाची सामान्य उद्दिष्टेः शरीराचे वजन कमी करा व वजन वाढण्याचा धोका कमी करून, वजन कमी करणे कायम ठेवा तसेच भविष्यात वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवा.

 

डॉ . भाविक चांगोले
फीजिशिअन