निरामय आरोग्य असे ईश्वराचे वरदान
चला त्याला आरोग्याचे नियम पाळून ठेवूया छान
लवकर निजे लवकर उठे हे सूत्र महान
आरोग्य, ज्ञान , यश प्राप्ती होई वाढे आत्मसन्मान
नित्य करा योग्याभ्यास नि सूर्यनमस्कार
प्राणवायू लाभे विपुल होई बलसंपन्न शरीर घेई सुंदर आकार
सोबतीला ठेवा आरोग्यदायी जीवनसत्वाने भरपूर संतुलित आहार
दूर दूर ठेवी सर्व व्याधी,मधुमेह आणि हृदय विकार
जीवनाला द्या आधात्मवादाची जोड
आयुष्याला स्वीकारा मिळालेला प्रसाद ईश्वराचा गोड
मेंदू वर नका वाढवू धावपळीचा 'लोड'
उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी उपाय हा सडेतोड
ईश्वराचे रूप असलेले निष्णात डॉक्टर असतात सदैव आपल्या पाठीशी
त्यांचा उपदेशात्मक सल्ला वेळोवेळी बाळगा छातीशी
योग्य वेळी मैत्री करा गुणी औषधांशी
बघा मग होते कसे आयुष्य निरामयी शतायुषी
अर्पण करा ही ओंजळ आयुष्याला निरामय आरोग्य सुमनांची
उधळण होऊ द्या आनंद ऐश्वर्य यशाच्या रंगांची
डॉ शुभांगी नागोराव-कल्पना इंगोले