चला जाणून घेऊया सर्वप्रथम काय आहे ही FNAC.
FNAC म्हणजे फाईन निडल एस्पीरेशन सायटोलॉजी या प्रक्रियेमध्ये निडल टाकून शरीरातील गाठीतील पेशींना बाहेर ओढले जाते आणि त्या पेशींना स्लाईडवर घेऊन त्याचा स्मिअर बनवला जातो . नंतर या स्मिअरची Morphology microscope मध्ये बघून रोगाचे निदान केले जाते. ही तपासणी सन 1930 या वर्षी पहिल्यांदा नमूद केल्या गेली व 1950 नंतर ही तपासणी रोगनिदानासाठी मोठ्या प्रमाणात अवलंबिली जायला लागली.
FNAC ही टेस्ट कोणत्या आजारामध्ये करावी ?
कोणत्याही व्यक्तीला शरीराच्या कोणत्याही भागाला किंवा अवयवाला गाठ अथवा सूज आल्यासारखे वाटत असेल तर ही टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. गाठ सहजरीत्या हाताला लागत असेल किंवा दिसत असेल तर आपण या गाठीची निडल टाकून तपासणी करू शकतो . तर जाणून घेऊया कुठल्या ठिकाणच्या गाठीची तपासणी आपण करू शकतो .
- थायरॉईड
- ब्रेस्ट
- सलावरी ग्लॅन्ड
- चरबीची गाठ
- लिम्फ नोड ( Lymph Node)
वरील ठिकाणी किंवा हाता – पायाला, कुठल्याही जॉईंटला गाठ असल्यास आपण एफ. एन .ए. सी .करू शकतो .काही वेळेस गाठ खूप छोटी असते त्यामुळे निडल टाकण्यात अडथळा येतो किंवा काही वेळेस शरीराच्या आतील अवयवांमध्ये गाठ असते . उदाहरणार्थ लिव्हर . अशा वेळेस आपल्याला सोनोग्राफीच्या मदतीने एफ. एन .ए. सी. टेस्ट करावी लागते .
एफ .एन. ए. सी .करताना काय तयारी करावी लागते ?
एफ .एन. ए. सी .च्या आधी विशेष अशी काही तयारी करावी लागत नाही . फक्त रुग्णाला काही ब्लीडींग डिसऑर्डर तर नाही ना? याची खात्री करून घ्यावी . रुग्ण काही Anticoagulant घेत असेल तर त्याला ते औषध बंद करण्याचा सल्ला देणे महत्त्वाचे असते.
एफ .एन. ए. सी .प्रक्रिया
एफ .एन. ए. सी या प्रक्रियेमध्ये अगोदर रुग्णाला जेथे गाठ असेल ती जागा बेटँडीन आणि स्पिरिटने स्वच्छ करावे . नंतर सिरींज गनला लावून गाठीमध्ये टाकावी . सेल्स ऍस्पिरिट करावे लागते . सेल्स स्लाईडवर घेऊन स्लाईडला फिक्स लाईनमध्ये टाकल्या जाते .अशा चार-पाच स्लाइड बनविल्या जातात. पहिल्या aspiration मध्ये व्यवस्थित मटेरियल न आल्यास ही तपासणी रिपीट करावे लागते . ही तपासणी करताना रुग्णाला फार त्रास होत नाही .फक्त इंजेक्शन दिल्यानंतर जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास या प्रक्रियेमध्ये रुग्णाला होतो . त्यामुळे जागा बधीर करण्याची देखील आवश्यकता भासत नाही . अस्पिरेटेड मटेरियल स्लाईडवर घेऊन स्टेनिंग केल्या जातं आणि नंतर स्लाईडची दुर्बिणीद्वारे तपासणी केल्या जाते . दुर्बिणीतून केलेल्या या तपासणीनंतर या सेल्स नॉर्मल आहेत की अँबनॉर्मल आहेत की मँलिग्ननंट आहे ,ते तपासल्या जाते. त्यानंतर , कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन आहे ते तपासले जाते .
या पद्धतीचे फायदे कोणते ?
- ही एक छोटी ,सुटसुटीत प्रक्रिया आहे .
- ही प्रक्रिया ओपीडी बेसिसवर ही करता येते .
- रुग्णाला भरती करून घेण्याची आवश्यकता नसते .
- प्रोसिजर झाल्यानंतर रुग्ण लगेच घरी जाऊ शकतो .
- छोटी प्रक्रिया असल्यामुळे या प्रक्रियेला खर्च देखील कमी येतो .
- तिसऱ्या दिवशी रुग्णाला रिपोर्ट मिळून जातो .
या पद्धतीचे तोटे
- कधी कधी रोगाचे खात्रीशीर निदान करू शकत नाही . अशावेळी पेशंटला बायोप्सी करण्याचा सल्ला दिला जातो.
- कधी कधी रिप्रेझेंटेटिव्ह मटेरियल ऍस्पिरेट केल्या जात नाही . अशा वेळेस प्रॉपर डायग्नोसिस होत नाही .
टेक होम मेसेज
अशा सुटसुटीत आणि सोप्या प्रोसिजर क्लीनिशियनने फर्स्ट चॉईस ठेवायला हवे .
डॉ .सुवर्णा कुऱ्हाडे