ज्वारी, बाजरी, नाचणी, राळे, कोद्रा,सावा, कुटकी/शावन, चेना/बॅरी अशी सर्व प्रकारची भरड धान्ये ही उच्च अँटिऑक्सिडेंटने परिपूर्ण असून पचायला देखील हलकी असतात. भरड धान्ये ही पौष्टिक तृणधान्य (न्यूट्री-सिरियल्स)' आहेत. म्हणूनच भरड धान्य (मिलेट्स) हे पोषण तत्त्वाचे आगार आहे. भरड धान्यांचा आहारात समावेश केल्यास प्रतिकारशक्ती वाढते.संयुक्त राष्ट्रसमितीने २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भरड धान्य नियमित पेरल्यामुळे मातीचा पोत सुधारतो.
भरड धान्य आरोग्यासाठी फायदेशीर असून भारतीय शेतीचा महत्त्वाचा भाग आहे. संयुक्त राष्ट्राने 2023 “मिलेट ईअर” म्हणून घोषित केले आहे. यामुळे प्रथमच, सर्व धान्यामध्ये भरड धान्याचे महत्त्व आणि पौष्टिकता जाहीर झाली आहे. भरड धान्य हा लहान-बीज असलेल्या तृणवर्गीय पिकांचा वैविध्यपूर्ण गट आहे.भरड धान्ये मानवी अन्नासाठी धान्य म्हणून मोठ्या प्रमाणावर पिकवलेजातात. हीधान्ये आकाराने बारीक, गोलाकार असून खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात.
भरड धान्याच्या श्रेणीत कुठले धान्य आहे?
भरड धान्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, जव, कोदो, सामा, सोया असून लघुधान्यात कुटकी, कोगनी, घीनासारखी धान्ये समाविष्ट आहेत. भरड धान्याचे पीक घेणे अत्यंत सोयीस्कर आहे. या धान्याच्या उत्पादनासाठी जास्त मशागत करावी लागत नाही. अगदी सहज आणि साध्या स्वरूपात घेतले जाणारे हे पीक आहे. विशेष म्हणजे या धान्याला पाणी कमी लागते आणि कमी सुपीक जमिनीत देखील ते उगवते. वातावरणाचा या पिकांवर काहीच विपरित परिणाम होत नाही. हे धान्य अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा, पोषण सुरक्षा,शेतकऱ्यांची उपजीविकेची सुरक्षा, जनावरांच्या चाऱ्याचीसुरक्षा, संतुलन आणि संवर्धन सुरक्षा करते.
ज्वारी -
ज्वारी विशेषतः कोरडवाहू भागात घेतले जाणारे पिक आहे. महाराष्ट्रात सोलापूर, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातील डोंगरभागात घेतले जाणारे हे पिक आहे.ज्वारीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम,विटामिन बी१, बी २, फायबर, पोटँशिअम, मॅग्नेशियम, सोडियम भरपूर प्रमाणात आढळते. कोलेस्ट्रॉल कमी करणे,वजन कमी करणे,पोट साफ करणे,मधुमेह कमी करणे यामध्ये हे धन्या फायदेशीर आहे. ज्वारीची खिचडी,दलिया,डोसा, लाडू,पराठे,पापड, आंबील हेपदार्थ जास्ती प्रमाणात प्रचलित आहेत.
बाजरी -
कोरडवाहू जमिनीत अगदी कमी पाण्यावर घेतले जाणारे बाजरीचे पीठ सहज काळ्यामातीत उगवते. याची गोडी काही वेगळीच असूनबाजरीमध्ये प्रोटीन, आयर्न, बिटाकँरोटीन, कॅल्शियम,फायबर, व्हिटॅमिन बी, झिंक भरपूर प्रमाणात आहे. बाजरीचे उपयोग वजन कमी करणे,शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवणे,हाडे मजबूत करणे, ऑस्टिओपोरोसिस मध्ये लाभदायक आहे. बाजरीअस्थमा आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लाभदायक आहे. बाजरीचे लाडू, खिचडी, भाकरी, लापशी, पापड हे ज्वारीचे प्रचलित पदार्थ आहेत.
नाचणी (रागी )-
नाचणीला आधीपासून सुपरफुड म्हणून मान्यता मिळालेली आहे. पूर्वी सर्व भागात पिकणारी नाचणी आता फक्त आदिवासी डोंगर भाग आणि कोकणात केली जाते. नाचणीमध्ये आयर्न,कॅल्शियम, फायबर, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, कॉपर, मॅगेनीज, झिंक भरपूर प्रमाणात आढळते. नाचणी ही वजन कमी करणे, बीपी कमी करणे, हाडे मजबूत करणे, कोलेस्टोल कमी करणे, पोट साफ करणे, आईचे दूष वाढविणे, मधुमेह कमी करणे, बी.पी.कमी होणे, त्वचेला वृद्धत्वपासून वाचविणे, ग्लुटेन फ्री, शरीराला मजबुती देणे यामध्ये अत्यंत लाभदायक आहे. नाचणीचे लाडू, डोसा,लापशी,पापड, खीर, इडली खूप प्रचलित आहे.
वरई (little Millets )-
आजही आदिवासी आणि कोकण भागात हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.डोंगरशेतीतील हे मुख्य पीक आहे. वरईमध्ये प्रोटीन, र्बोदके, फायबर, मियासीनमॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आढळतात. वरई खाणे हे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. वरइ हे धान्य मधुमेह,दमा, कोलेस्टोल, उच्च रक्तदाब कमी करण्यामध्ये फायदेशीर आहे. तसेच शरीराची सूज कमी करणे, हाडे मजबूत करण्यामध्येमदत करते. वरइचे कटलेट,दलिया, इडली,खिचडी खूप प्रचलित आहे.
जव-
राजस्थानमध्ये प्रामुख्याने आढळणारे जव. जवामध्ये कार्बोहायड्रेट,प्रोटीन,डाएटरी फायबर,सोडीअम, मँगनीज भरपूर प्रमाणात आढळतात. जव हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, हृदयाच्या समस्येपासून वाचविणे, मधुमेह व उच्च रक्तदाब कमी करणे, बद्धकोष्ठतेची समस्या दूर करणे,आतडे निरोगी ठेवण्यास मदत करणे,ओस्टीऑपोरोसीस रोखण्यास मदत होते. पित्ताशायाच्या खड्यापासून संरक्षण, कर्करोगापासून बचावामध्ये फायदेशीर आहे.जवाचे सूप, लापशी प्रचलित आहे.
राळा (Foxtail Millets)-
पूर्वी सर्वच भागात राळा पिकवला जाई.खानदेशात पितरांना राळ्याचीच खीर करण्याची परंपरा होती, यावरून हे धान्य किती जुने आणि परंपरागत आहे, हे स्पस्ट होते. यामध्ये विटामिन ए, इ, कॅल्शियम, प्रोटीन, फॉलिक ऍसिड, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, डाएटर फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. राळामध्येगँस्ट्रो संरक्षणात्मक गुणधर्म,फँसीनोजेनिक गुणधर्म, बुरशीजन्य संसर्ग व्यवस्थापित करण्याची क्षमता आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे,मज्जासंस्थेचे कार्य योग्य करण्यास मदत करणे, वजन आणि मधुमेह रोखण्यासाठी देखील राळाची मदत होते. राळाची खीर,भात,पुलाव, पराठा हे पदार्थप्रचलित आहेत.
वरी ( Proso Millets) -
महाराष्ट्रातील काही भागात वरई सारखेच दिसणारे हे धान्यपिकवले जाते. वरीमध्ये फॉलिक ऍसिड,मियासीन, फायबर, प्रोटीन,अमिनो अँसिड, मॅग्नेशियम,मिथीओनाइनभरपूर प्रमाणात आढळतात. वरी हे धान्य मधुमेह कमी करणे,शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे,कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. वरीची इडली, खिचडी, डोसा, उपमा हे प्रचलित पदार्थ आहेत.
कोदो -
एकावर एक असे सात थर असणारे कोदोहे धान्य.याचे वैशिस्ट म्हणजेआवरण काढले नाही तर अनेक वर्ष हेधन्या असेच ठेवता येते.गडचिरोली,धुळे आणि कोकणात पिकणाऱ्याया पदार्थांमध्ये आयर्ण, प्रोटीन,फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. कोदोमध्ये वजन कमी करणे, पोट साफ करणे,रक्त साफ करणे, ग्ल्यूटेन फ्री, रक्त साफ करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, शरीराला मजबुती देणे यासाठी मदत करतात. याचा पुलाव,उपमा, चिला, इडली प्रचलित आहे.
बर्टी (Barnyard Millet)-
सर्वात कमी दिवसात पक्व होणारे हे धान्य होय. याचेवैशिष्ट्य म्हणजे अनेक रंगात हे उपलब्ध असून कोरडवाहू व अती पाऊस असणाऱ्या भागात देखील उत्तम आहे. बर्टीमध्ये भरपूर प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, विटामिन बी आढळते. हे धान्य हृदयाची समस्या, मधुमेह, एँलर्जी, डोकेदुखी, अशक्तपणा, टायफाईड, कॅन्सर कमी करण्यास अत्यंत मदतकारत आहे. बर्टीचे लाडू,खिचडी, दलिया, चीला,उपमा देखील प्रचलित आहे.
ब्राऊन टोप मिलेट (Brown Top Millet)
मूळचे भारतीय असलेले हे मिलेट धान्य. सध्यातरी याचे उत्पादन फक्त दक्षिण भारतात घेतले जाते.याचे वैशिष्ट्य म्हणजे हे धान्य खाल्ल्यानंतर अनेक तास भूक लागत नाही. भरपूर ऊर्जा यातून मिळते. यामध्ये प्रोटीन, फायबर,व्हिटॅमिन बी १, बी २, बी ३, मॅग्नेशियम आढळते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हृदयाची समस्या कमी करणे,वजन कमी करणे,पोट साफ करणे, हाडांना मजबुती देणे, अल्सर कमी करण्यात हे मदत करते. ब्राऊन टोप मिलेटची इडली,ढोकळा,सूप, दलिया,रोटी खूप फायदेशीर आहेत.
थोडक्यात, बाजरीमध्ये फॉस्फरस उच्च प्रमाणात असून, ते पेशींमधील ऊर्जा आणि अन्य खनिज पदार्थ साठवण्यास साहाय्य करतात. लोहाचेही प्रमाण अधिक असल्यामुळे शरिरातील हिमोग्लोबीन वाढते. नाचणीमध्ये नैसर्गिक कॅल्शियम सर्वाधिक असल्यामुळे प्रतिदिनच्या सेवनामुळे हाडांचे आरोग्य चांगले रहाते. राळे हे पाचक असून त्यात लोह आणि खनिज पदार्थ भरपूर आहेत. वरईमध्ये उच्च लोह धातू आहे. कोडो/ कोद्रा मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी उत्कृष्ट आहे. भारतीय भरड धान्याचे महत्त्व जाणून शेतकर्यांनी नगदी पिकांच्या मागे न लागता ही पारंपरिक पिके घेऊन देश सुजलाम् सुफलाम् करावा या धान्यांचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ पालकांनीही बनवून मुलांना द्यावेत.यामुळेमुले ‘जंक फूड’च्या मागे लागून शरिराची हानी करून घेणार नाहीत. केवळ भात आणि गहू या दोनच धान्य पिकांवर अन्नासाठी अवलंबून राहण्यापेक्षा बदलत्या तापमानात तग धरू शकणारे हे भरडधान्य नक्कीच भारताची भूक भागवू शकेल. या धान्याचा आहारामध्ये भरपूर उपयोग करून आपण आपल्या आरोग्याविषयी जागरूक होऊया.
प्रतिक्षा ठोसर
आहात तज्ञ,
डॉ. हेडगेवार हॉस्पिटल, अमरावती.